पाहून झाले जग, अता थांबायचे आहे मला
अपुल्या घरातच शेवटी गुंतायचे आहे मला
आधी झऱ्याचे स्वप्न होते एक सागर व्हायचे
आता म्हणे, मातीमधे मिसळायचे आहे मला
शाळेतले सुविचार बहुधा विसरल्यागत वाटते
एकेक अक्षर त्यातले गिरवायचे आहे मला
ओघात काळाच्या उद्या घडणार ते घडवू अता
आयुष्य वाया आपले घालायचे आहे मला
-भूषण कुलकर्णी