उंबऱ्याबाहेर पाउल टाकते कोणी
अंगणातच घुटमळत मग राहते कोणी
वेगळेपण सिद्ध करणे वाटते अवघड
आपला साधेपणा मग सांगते कोणी
शेवटी कोठेच नाही मुक्तता, कळते
ओळखीच्या पिंजऱ्यातच गुंतते कोणी
योग्य ती किंमत जगाला जाणवत नाही
आपल्या पेटीत रत्ने ठेवते कोणी
भूतकाळाचे समांतर विश्व एखादे
आठवण माझी तिथेही काढते कोणी
-भूषण कुलकर्णी