चिऊ-आई

sparrow2

पिले दाणे टिपावया, दूरदेशी गेली
अद्याप न परतली, झाली पापणी ओली…

तिकडची हवा, तिकडचं पाणी
का मनात भरलं, तिकडचं कोणी!

फळे रसाळी, स्वच्छंद गाणी
गेली असतील, पिले रमूनी!

ते सुंदर वन, त्यांना भावले
का कोणी सोनेरी, पिंजर्यात कोंडले?

पिंजराही कदाचित, आवडला असेल
जिथे आरामात, सर्वकाही मिळेल!

हे ईश्वरा, तुजला एवढीच प्रार्थना
इवल्याश्या पंखांवर, विश्वास दे त्यांना

माझी थोडी आठवण, रहावी मनांत
त्यांनी कुठेही रहावे, असावे निवांत…

(This poem thinks from the point of view of a mother whose children are in foreign country, taking analogy of mother-sparrow)

© भूषण कुलकर्णी

Leave a comment