स्थित्यंतर

img_20170121_063052

आज यशोशिखरावरही
मन का अशांत आहे
गतकालाच्या आठवणींत
पुन्हा का रमत आहे

पुरान्याच गीतपंक्ती
पुन्हा का गुणगुणत आहे
गणिती अभ्यासातही
भावना का शोधत आहे

संगणकाच्या पडद्यावरही
बालपण का चितारीत आहे
गल्ली—क्रिकेट पाहताना
क्षणभर का थबकत आहे

शेकडो कल्पनांमध्ये
एक ध्येय शोधत आहे
पुढच्याच क्षणाला
पुन्हा का बहकत आहे

धावताना राहिलेले
क्षण पुन्हा जगत आहे
आज पहिल्यानेच
भावना काव्यात मांडत आहे

© भूषण कुलकर्णी

One Comment

Leave a comment