चित्रगुप्त

नेमस्त कुंडल्यांचे नेमस्त बारकावे
नियतीस वाटते की काही नवे लिहावे

विज्ञान मानणारा स्वर्गात पोचला तर
प्रत्यक्ष देव त्याला देईल का पुरावे?

बाहेर चौकटीच्या पडणे कठीण नाही
व्याख्येत चौकटीच्या थोडे बदल करावे

त्या थोर मानवांचा अपमान हाच आहे
येथील माणसांचे आदर्श ते म्हणावे

आता तुझाच आहे आधार चित्रगुप्ता
साऱ्या जुन्या स्मृतींना तू घालवून द्यावे

2 Comments

  1. Unknown's avatar

    अप्रतिम, थोर मानवांचा अपमान येथील (अशा ) माणसांचे आदर्श ते म्हणावे. अगदी खरंय,थोर महापुरुषांचा अपमान तो सध्याच्या द्वेषपूर्ण वातावरण व लोकांचा खालावलेली विचारसरणी असलेले लोक आपले आदर्श ते थोर मानव म्हणून मिरवतात

    Like

    Reply

Leave a reply to गुळवे सिध्देश्वर Cancel reply