कुठे निमाले काव्य तुझे?

pen

चिंतेच्या ढिगार्यात
भयाच्या अंधारात
अनिश्चिततेच्या सावटात
वासनेच्या वादळात
का हरवले काव्य तुझे?

ते निर्मळ मन
भावनिक आत्मकथन
माणुसकीचे दोन क्षण
रम्य निसर्ग भ्रमण
यांसह गेले काव्य तुझे?

काव्य हे जीवन
साक्षात आनंदवन
माणसाचे माणूसपण
कालचक्राचे वंगण
समजून घे काव्य तुझे!

निर्मळ मनात
प्रेमळ बंधनात
दैनिक जीवनात
वा सुखस्वप्नात
पुन्हा प्रकटेल काव्य तुझे!

© भूषण कुलकर्णी

2 Comments

Leave a comment